असलदेत चिरे वाहतूक ट्रक नियंत्रण सुटल्याने कलंडला
28338
असलदेत चिरे वाहतूक ट्रक
नियंत्रण सुटल्याने कलंडला
नांदगाव, ता. ३ ः असलदे-उगवतीवाडी येथील चढावाला देवगडच्या दिशेने जाणारा चिरे वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला गटारात कलंडला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. अपघातात ट्रकचे नुकसान झाले.
कोल्हापूर येथून देवगडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा चिरे वाहतूक करणारा ट्रक सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास असलदे उगवतीवाडी येथील चढावाला आला असता चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक विरुद्ध दिशेला जात गटारात कलंडला. सुदैवाने यावेळी समोरून येणारे वाहन किंवा नागरिक नसल्याने अनर्थ टळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

