घरपट्टी, पाणीपट्टीची 
थकबाकी आजच भरा

घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी आजच भरा

Published on

घरपट्टी, पाणीपट्टीची
थकबाकी आजच भरा

देवगड नगरपंचायत ः अन्यथा कारवाई

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः मागील २०२० पूर्वीपासून २०२३ पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी प्रलंबित असलेल्या थकबाकीदारांची नावे येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने येत्या १४ मार्चला असलेल्या लोक अदालतीमध्ये सादर केली जाणार आहेत. त्यामुळे अखेरची संधी म्हणून संबधित थकबाकीदारांनी आपली देय रक्कम उद्यापर्यंत (ता.४) कार्यालयात भरणा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनामार्फत चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली अंतिम टप्प्यात आहे. वसुलीसाठी प्रशासनामार्फत कठोर कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत शहरात घंटागाडीद्वारे कर भरण्याबाबत जनजागृती व घरोघरी जाऊन वसुलीचे कामकाज सुरू आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. तरीही कर न भरल्यास जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या थकबाकदारांची २०२० पूर्वीपासून २०२३ पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी प्रलंबित आहे, अशी प्रकरणे येत्या १४ मार्चला येथील दिवाणी न्यायालयात आयोजित लोक अदालतीमध्ये दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व थकबाकीदारांनी याची गांभीर्याने दखल घेऊन उद्यापर्यंत (ता.४) आपली थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम तत्काळ नगरपंचायत कार्यालयात जमा करावी, अन्यथा संबंधितांची प्रकरणे लोक अदालतीमध्ये सादर केली जातील. होणाऱ्या कारवाईस संबंधित थकबाकीदार जबाबदार राहतील, असे कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com