क्राईम

क्राईम

Published on

प्रेमविवाहाच्या रागातून एकास मारहाण
अपहरण करून गाडीतून नेले ः संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : प्रेमविवाह केल्याच्या रागातून एकास अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार चिपळूणमध्ये सोमवारी सायंकाळी घडला.
याबाबत शहरातील मजरेकाशी येथील फैजान अब्दुल कादीर कर्जिकर याने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कर्जिकर हा नगरसेवक साजिद सरगुरुह यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. २७ जानेवारीला त्याने एका तरुणीबरोबर कायदेशीर विवाह केला. त्या रागातून सोमवारी (ता. २) सायंकाळी फैजान हा आपल्या मालकाच्या घरातून फॅक्टरीची चावी घेऊन फॅक्टरी उघडण्यासाठी जात होता. संशयित अमान नाडकर, तबीश पेचकर आणि समीर पेचकर यांनी त्याचे अपहरण करून जबरदस्तीने गाडीत कोंबले. तोंड दाबून त्याला मारहाण करत गुहागर बायपासमार्गे खेडच्या दिशेने नेले. महामार्गावर लवेल (ता. खेड) येथे रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवण्यात आली. तेथे फैजानचा जबरदस्तीने व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर त्याला एका वकिलाकडे नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्याकडून जबरदस्तीने फुस लावून प्रेमविवाह केल्याचे लेखी लिहून घेतले जाणार होते. परंतु फैजानच्या वतीने त्याचे नातेवाईक आणि नगरसेवक सरगुरुह पोलिस ठाण्यात गेल्याचे समजल्यानंतर अमान नाडकर, तबीश पेचकर, समीर पेचकर, मुस्कान दलवाई आणि अय्याज शहा तेथून पसार झाले. याची तक्रार फैजान कर्जिकर याने चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com