खारेपाटण शाळा जिल्ह्यात आदर्शवत

खारेपाटण शाळा जिल्ह्यात आदर्शवत

Published on

28535

खारेपाटण शाळा जिल्ह्यात आदर्शवत

संजय आंग्रे ः वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील आदर्श शाळा आहे. येथील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती एकत्र मिळून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. याचा इतर शाळांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात झाला. स्नेहसंमेलन व फूड फेस्टिव्हल कार्यक्रमाचे उद्‍घाटन श्री. आंग्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार, जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, संदेश पटेल, खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव, दानशूर व्यक्तिमत्व अमोल तळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य क्षीतिजा धुमाळे, अस्ताली पवार, मनाली होणाळे, अण्णा तेली, विजय देसाई, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण अध्यक्ष दयानंद कोकाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सुरेंद्र कोरगावकर, खारेपाटण केंद्रशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रह्मदंडे, मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर आदी उपस्थित होते. रंगवली प्रदर्शन, फूड फेस्टिव्हलचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. सलग दोन दिवस झालेल्या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख संजय पवार, विनायक जाधव व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com