आंबडोस ग्राम विकास मंडळातर्फे
''स्वच्छ वाडी''सह विविध स्पर्धा

आंबडोस ग्राम विकास मंडळातर्फे ''स्वच्छ वाडी''सह विविध स्पर्धा

Published on

आंबडोस ग्राम विकास
मंडळातर्फे विविध स्पर्धा
ओरोस, ता. ४ ः आंबडोस ग्राम विकास मंडळ मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन ७ ते १० मे या कालावधीत आंबडोस येथे होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील आंबडोस गावाच्या वतीने व आंबडोस ग्राम विकास मंडळ, मुंबईच्या विद्यमाने गावासाठी ''स्वच्छ वाडी'' स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वाडीसाठी आकर्षक रोख रक्कम व बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी घराघरात आणि संपूर्ण वाडीमध्ये स्वच्छता राखणे, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग, घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरणे, ग्रामसभेला उपस्थिती, ग्रामपंचायतीच्या उपक्रमातील सक्रिय सहभाग, शिक्षण, गुंतवणूक विषयक जनजागृती, वाडीतील आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार आदी निकष ठरविण्यात आले आहे. याबरोबरच आंबडोस ग्राम विकास मंडळ, मुंबईने गावातील तरुणांना उत्तेजन देण्यासाठी ७ व ८ मे रोजी भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्री देव रवळनाथ मंदिर नजिकच्या मैदानावर ही स्पर्धा सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहेत. विजेत्या संघाला १५ हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला ७५०० रुपयांचे बक्षीस तसेच दोन्ही संघांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच ७ मे रोजी दुपारी स्लो सायकलिंग स्पर्धा व रिले रेस, ८ व ९ मे रोजी दुपारी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी मनोरंजन खेळ, ९ मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉन स्पर्धा, १० मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून स्नेहमेळावा होणार आहे. स्नेहसंमेलनात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com