कुणकेश्वर-कातवण शाळेला मानांकन

कुणकेश्वर-कातवण शाळेला मानांकन

Published on

28555

कुणकेश्वर-कातवण शाळेला मानांकन

गुणवत्ता मापनात यश; विविध उपक्रमांची दखल

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण या शाळेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड क्रिटेशन फ्रेमवर्क’ या गुणवत्तामापन प्रक्रियेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतल्यानंतर शाळेला उच्च मानांकन प्राप्त झाले आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेने विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तावृद्धी कार्यक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या माध्यमातून सातत्याने प्रगती साधली. याच पार्श्वभूमीवर स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड क्रिटेशन फ्रेमवर्क अंतर्गत शाळेचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ४२९ शाळांना बाह्यमूल्यमापनात ‘ए +’ श्रेणी प्रात झाली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक तीन शाळांचा समावेश आहे. या शाळांमंध्ये कुणकेश्वर कातवण या शाळेचा समावेश आहे. या प्रक्रियेत अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची प्रगती, सहशालेय उपक्रम, भौतिक सुविधा, व्यवस्थापनाची कार्यक्षमता आदी विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले. या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी सुदाम जोशी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी शाळेचे अभिनंदन केले. कुणकेश्वर कातवण शाळेने गुणवत्तेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
...................
मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर
शाळेमध्ये इन्टर ॲक्टिव्ह बोर्ड, प्रोजेक्टर, टॅब, संगणक कक्ष याच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बुद्धिबळ, तायक्वांदो, कॅरम यांसारखे वर्ग मोफत घेतले जातात. विविध उपक्रम नियोजित आहेत. या शाळेच्या समई नृत्याच्या कार्यक्रमाला सुद्धा जिल्ह्यातून मागणी होत आहे. यामधून समाजप्रबोधन व संस्कृती जपाण्याचा प्रयत्न शाळेने केला आहे.
..................
ग्रामस्थांचेही योगदान
शाळेला यशस्वी करण्यासाठी कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, उपसरपंच शशिकांत लबडे, देवस्थान कुणकेश्वर अध्यक्ष एकनाथ तेली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर जोईल, उपाध्यक्ष साक्षी धुरी, देवस्थान माजी अध्यक्ष संतोष लब्दे, वाडी अध्यक्ष संजय आचरेकर, माजी अध्यक्ष प्रदीप मुणगेकर, भक्तप्रल्हाद गावडे यांचे सहकार्य लाभले.
......................
कोट
गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. आगामी काळातही शाळेला आणखी उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे.
- दीपाली ढोके, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com