स्वच्छ गावासाठी एकवटले हात

स्वच्छ गावासाठी एकवटले हात

Published on

28564

स्वच्छ गावासाठी एकवटले हात

सुकाळवाडमध्ये स्वच्छता; ‘समृद्ध पंचायत राज’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : राज्याच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानांतर्गत सुकळवाड येथे स्थानिक आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामसंघ परिसर स्वच्छतेचा उपक्रम उत्साहात पार पडला. यात लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला.
या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर यांनी केले. यावेळी प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाताडे, माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती सभापती प्रसाद मोरजकर आणि ग्रामविकास अधिकारी वेदिका गोसावी उपस्थित होत्या. लोकप्रतिनिधींनी स्वतः हातात झाडू घेऊन उपकेंद्र परिसरातील कचरा व झाडे-झुडपे काढून परिसर चकाचक केला.
ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत आरोग्य विभागानेही मोलाचे योगदान दिले. यावेळी समिती सदस्य प्रकाश पावसकर, उमेश पाताडे, पोलिसपाटील लक्ष्मण काळसेकर, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, आरोग्य सेवक श्रीमती लोबो, आशा सेविका अंकिता पाताडे, रिया पाताडे, आरोग्य मदतनीस राजश्री पेडणेकर, ग्रामसंघ बचतगट अध्यक्षा वैदेही मसुरकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी सुभाष म्हसकर व इतर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. गाव सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी केवळ अभियान म्हणूनच नव्हे, तर कर्तव्य म्हणून स्वच्छतेकडे पाहिले पाहिजे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. उपकेंद्र परिसराच्या या स्वच्छतेमुळे रुग्णांना आणि ग्रामस्थांना आता अधिक प्रसन्न वातावरण मिळणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com