वेंगुर्लेत अंगणवाडीच्या भिंती 
अभ्यासक्रमामुळे बोलक्या

वेंगुर्लेत अंगणवाडीच्या भिंती अभ्यासक्रमामुळे बोलक्या

Published on

28568

वेंगुर्लेत अंगणवाडीच्या भिंती
अभ्यासक्रमामुळे बोलक्या

नगरसेवक रेडकर यांचे सहकार्य

वेंगुर्ले, ता. ४ ः येथील शाळा क्र. ४ च्या अंगणवाडीतील भिंतीवर रेखाटलेली दैनंदिन आहाराबाबतची घोषवाक्ये, बाराखडीसोबतच शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे शाळेच्या निर्जीव भिंती बोलक्या झाल्या आहेत. मुलांच्या शिक्षणानुसार रंगविण्यात आलेल्या वर्गखोलीमध्ये प्रवेश करताच वातावरण अल्हाददायक वाटत आहे. या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणारे हॉटेल कृष्णाचे मालक आनंद रेडकर व नगरसेवक समिधा रेडकर यांचा शाळेच्या वतीने राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक उमेश येरम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हर्षद परब, माजी उपाध्यक्ष अस्मिता राऊळ, ॲड. श्रद्धा परब-बाविस्कर, वर्गखोलीचे रंगकाम करणारे श्री. मठकर, मुख्याध्यापक संतोष परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे, अंगणवाडी सेविका स्मिता कोणेकर, राधा बागवे, सुनिता कांबळे, मदतनीस अवनी जाधव यांच्यासह पालक कार्मेलिन डिसोजा, अन्वी जाधव, सुनंदा धारगळकर, सान्वी जाधव, धामनिया तांडेल व विद्यार्थी उपस्थित होते. या रंगरंगोटीमुळे या वर्गखोलीमध्ये शैक्षणिक माहोल निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com