संगीत नाट्यात ‘क्षितिज’चे यश

संगीत नाट्यात ‘क्षितिज’चे यश

Published on

28575

संगीत नाट्यात ‘क्षितिज’चे यश
सावंतवाडी : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’ संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाने ५ वैयक्तिक पारितोषिके पटकावून कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे ७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धेची अंतिम फेरी झाली. क्षितिज इव्हेंटच्या कलाकारांनी नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनयात आपली छाप पाडली. यामध्ये संजय जोशी-रंगभूषा (प्रथम), दत्तात्रय उर्फ बाळ पुराणिक- नेपथ्य (द्वितीय), वैभवी पुराणिक-वेशभूषा (द्वितीय), अभिषेक कोयंडे-प्रकाश योजना (तृतीय), आज्ञा कोयंडे-अभिनय (रौप्य) यांना यश मिळाले. स्पर्धेत प्रथम ‘संगीत कधी तरी कोठे तरी’ (समर्थ थिएटर्स, गोवा), ‘संगीत पद्माराणी’ (भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे), ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ (परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे, मुंबई) या नाट्यकृती अव्वल ठरल्या. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
-----
28574

नाणोस जोशीवाडी रस्त्याचे भूमिपूजन
आरोंदा ः नाणोस जोशीवाडी येथील महापुरुष देवस्थानपर्यंतच्या रस्त्याला संरक्षण भिंत व मुख्य रस्ता ते महापुरुष देवस्थानपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाणोस सरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या रसिका जोशी, सानिया शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, सखाराम जोशी, ज्ञानदेव जोशी, नारायण कांबळी, रोहन जोशी, राजेश जोशी, रवींद्र जोशी, रघुनाथ जोशी, समिता जोशी, सरिता जोशी, रुपाली जोशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com