

rat4p2.jpg-
28483
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना नीलेश सावे.
विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखावेत
नीलेश सावे; कीर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखले पाहिजेत. त्यासाठी आपण चांगले गुरू किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. त्या द्वारे आपण जीवनात उत्तम मार्गक्रमण करू शकतो. अनेकांच्या अनुभवातून, आत्मचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आत्मचिंतन करावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक नीलेश सावे यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. देव, घैसास, कीर महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मॅजेस्टिक फ्युचर हब इन्स्टिट्यूट यांच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले. या वेळी कणकवली कॉलेज युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आशिष नाईक, राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा सुवर्णपदक विजेते विवेक वारभुवन आणि अभिनेते नीलेश पवार उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक राखी साळगावकर, विज्ञान विभागप्रमुख घाणेकर तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड उपस्थित होते. अभिनेता पवार यांनी आवाजावर प्रभुत्व कसे मिळवावे, या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, व्यक्तिमत्व विकासामध्ये केवळ बाह्यरूप महत्त्वाचे नसून आवाज, बोलण्याची शैली आणि आत्मविश्वास यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आवाज आणि संवाद, स्पष्ट उच्चार, योग्य शब्दप्रयोग आणि आवाजातील चढ-उतार, संवाद अधिक प्रभावी करतात. आत्मविश्वास ः आवाजातील ठामपणा व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतो. आवाजाच्या सरावात नियमित श्वसन व्यायाम, वाचन आणि बोलण्याचा सराव आवश्यक आहे. अभिनय, सूत्रसंचालन आणि सार्वजनिक जीवनात स्पष्ट व प्रभावी आवाज यशाचे दार उघडतो.
विवेक वारभुवन यांनी प्रभावी वक्तृत्वासाठी आवश्यक घटक जसे की, विषयाची सखोल तयारी, आत्मविश्वास, योग्य देहबोली, वेळेचे भान आणि प्रभावी शब्दप्रयोग यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व विविध शंका विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सांस्कृतिक विभागाने कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. साईप्रसाद पवार, अभिषेक रहाळकर व प्रा. विनय कलमकर यांनी तांत्रिक सहाय्य केले. प्रा. मिथिला वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.