

rat4p3.jpg-
28484
रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मंडळातर्फे गुणवंत शिक्षक संजना तारी यांना पुरस्कार प्रदान करताना दाक्षायणी बोपर्डीकर. सोबत रवींद्र इनामदार, प्राचार्या डॉ. राजश्री देशपांडे, विनायक हातखंबकर, गणपती एडवी, डॉ. चरणदास कांबळे आदी.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्ग दाखवणारे बनावे
दाक्षायणी बोपर्डीकर; गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : बीएडमध्ये शिकताना जे शिकवले जाते ते शिक्षक म्हणून काम करताना आचरणात आणावे. शिक्षक म्हणून वर्गात जाताना पूर्ण तयारी करून जाणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्ग दाखवणारे बनावे. आई ही आपली पहिली गुरू असते तर शिक्षक हे विद्यार्थ्याचे आदर्श असतात, असे प्रतिपादन दी न्यू सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले. शासकीय अध्यापक महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मंडळाच्या गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार वितरण व बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री देशपांडे, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, खजिनदार विजय वाघमारे, सल्लागार विनायक हातखंबकर, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव गणपती एडवी, बीएड कॉलेजचे समन्वयक डॉ. चरणदास कांबळे, डॉ. अस्मिता मजगांवकर, सदस्य रवींद्र पाटणकर, रजनी पेजे आदी उपस्थित होते.
या वेळी गुणवंत शिक्षक संजना तारी, दामिनी भिंगार्डे, जयेश गुरव, विजय बसवंत यांना पुरस्कार देण्यात आले. यानंतर वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. रवींद्र इनामदार यांनी चांगल्या सहकार्याबद्दल माध्यमिक शिक्षण विभागाचे, क्रीडा स्पर्धेसाठी पटवर्धन हायस्कूलचे मैदान दिल्याबद्दल भारत शिक्षण मंडळाचे, चंपक मैदान दिल्याबद्दल रत्नागिरी नगरपालिकेचे, प्रमाणपत्र लेखनासाठी सहकार्याबद्दल कृ. चिं. आगाशे शाळेतील शिक्षकांचे विशेष आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.