‘एनएमएमएस’मध्ये पणदूर हायस्कूलचे यश
28587
‘एनएमएमएस’मध्ये पणदूर हायस्कूलचे यश
कुडाळ ः तालुक्यातील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा या शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेच्या शिक्षिका पी. एम. राठोड, पी. पी. दाभोलकर, आर. झेड. बागुल यांच्यासह सर्व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन आपासाहेब गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
.....................
28588
कोळोशीत विज्ञान दिन उत्साहात
नांदगाव ः थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा केला जाणारा विज्ञान दिन कोळोशी हडपीड प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कूलमधील बालवैज्ञानिकांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळा समिती सदस्य किशोर राणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अंधश्रद्धेचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे मनोगत मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका वाडकर यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनासाठी विज्ञान शिक्षक किरणकुमार पाताडे, निशिकांत सुतार आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

