गाणेतील मारहाणीत एकजण जखमी

गाणेतील मारहाणीत एकजण जखमी

Published on

गाणेतील एक जण
मारहाणीत जखमी
चिपळूण, ता. ४ ः तालुक्यातील राजवाडी-गाणे पाथर्डी येथे नदीकिनारी एकाला मारहाण झाल्याची घटना घढली. या प्रकरणी अक्षय गंगाराम निकम (वय २२, रा. राजवाडी, गाणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ मार्चला ८.३० वाजता घडली. राजू संजय जाधव (२४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेची फिर्यादी राजू संजय जाधव याने दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अक्षय व फिर्यादी राजू नात्याने भावजी व मेहुणे आहेत. राजू जाधव हा जेवण करून बसला असताना संशयित अक्षय दारू पिऊन त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून भांडण करत होता. यावेळी राजू जाधव याने तू नेहमी दारू पिऊन घरातील लोकांना व शेजाऱ्यांना त्रास का देतो, असे विचारताच नदीतील दगड उचलून अक्षयने राजूच्या डोक्यात मारला. आमच्या भांडणात तू येऊ नको, नाही तर तुला ठार मारीन, अशी धमकीही अक्षयने राजूला दिली. मारहाणीत राजू जाधव जखमी झाला असून, अधिक तपास शिरगांव पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com