राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव

राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव

Published on

संस्था जाहिरातदार आहे


‘जीआयटी’मध्ये १३, १४ ला
तांत्रिक महोत्सवाचे आयोजन
चिपळूण, ता. ४ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे १३ व १४ मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव ‘शोध २०२६’ चे आयोजन केले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवामध्ये विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्पर्धा होणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डाटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, एम्बेडेड सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांवर आधारित तांत्रिक स्पर्धा हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. तांत्रिक महोत्सवांतर्गत पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विझ, बिझनेस प्लॅन, इंडस्ट्रिअल सेफ्टी चॅलेंज, कॅड मॉडेलिंग, सर्किट डिझाईनिंग आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष प्रोटोटाइप स्वरूपात सादर करता येतील. या महोत्सवात कोणत्याही डिप्लोमा कॉलेजचे विद्यार्थी सर्व तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील.
याच महोत्सवाच्या आधी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग आणि संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ मार्चला राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉन ‘कोडबिट्स 4.0’ होणार आहे. या हॅकथॉनमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थी संघ सहभागी होणार असून, त्यांना २४ तासांच्या कालावधीत प्रत्यक्ष सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित उपाय विकसित करावे लागणार आहेत. अधिक माहिती अथवा सहभागासाठी विद्यार्थी प्रतिनिधी राजीव सिंग यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com