‘मालवणी करंडक’ स्थानिकांचे व्यासपीठ
28596
‘मालवणी करंडक’ स्थानिकांचे व्यासपीठ
संदीप गावडे ः सावंतवाडीतील एकांकिका महोत्सवात ‘देवराई’ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : मालवणी भाषेसाठी मालवणी करंडक महोत्सव समितीकडून सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. विविधांगी अभिनयाने या महोत्सवाची उंची वाढली आहे. सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर हा सुंदर महोत्सव निश्चितच यादगार ठरला, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केले.
ओंकार कलामंच सावंतवाडी आणि पाटणकर एज्यूकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून येथे आयोजित मालवणी करंडक महोत्सवाचा नेरुर येथील आयडीएल इंग्लिश स्कूलची ‘देवराई’ एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. रत्नागिरी येथील अभियांत्रिकी कला मंडळ यांची ‘तुकारामाची टोपी’ने द्वितीय तर अंधेरी येथील रंगवलय या नाट्यसंस्थेच्या ‘बार बार’ या एकांकीकेने तृतीय क्रमांक पटकावला.
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संदीप गावडे व मायकल डिसोझा यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. तब्बल चार दिवस येथील पालिकेच्या उद्यानासमोरील जागेत या महोत्सवाचे आयोजन केले होते. यात तब्बल १२ संघांनी सहभाग घेतला.
मायकल डिसोजा यांनी, मालवणी करंडक महोत्सवामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे. आगामी काळात या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रिल स्टार गौरी बांदेकर, स्वरुप कासार, गायक नितीन बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, नीलेश जोशी आदींचा सन्मान करण्यात आला.
महोत्सव यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, आराध्या मोरजकर, कश्मिरा पाटणकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिध्देश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. आभार अमोल टेंबकर यांनी मानले.
---
सर्वोत्कृष्ट अभिनेता ‘ओन्या’
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून लपंडाव एकांकिकेतील ‘ओन्या’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सायलेंड स्क्रीम), सर्वोत्कृष्ट नायिका संस्कृती शर्मा (तृतीय), सर्वोत्कृष्ट लेखक किशोर नाईक (देवराई), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किशोर नाईक (देवराई), सर्वोत्कृष्ट वाचिक (मराठी)-अजित मांजरेकर (अमृत्स्यपुत्र), सर्वोत्कृष्ट वाचिक (मालवणी)-प्रणाली देऊलकर (गार्हाणा), सर्वोत्कृष्ट बालकलाकार-आरोही मेस्त्री (पडीक), अनुरा चौधरी (देवराई), आयुष चव्हाण (देवराई). सर्वोत्कृष्ट नेपथ्य श्याम सारंग (देवराई), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना (तुकारामाची टोपी), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (पडीक) आदींना गौरविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

