हॉटेलमधील आचाऱ्याचा मृत्यू

हॉटेलमधील आचाऱ्याचा मृत्यू

Published on

हॉटेलमधील आचाऱ्याचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ ः तालुक्यातील लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ४) सकाळी घडली. सद्दाम यासीन मुरूडकर (वय ३४, रा. टांगर) हे त्या तरूणाचे नाव आहे. लाडघर येथील एका रिसॉर्टमध्ये सद्दाम आचारी म्हणून कार्यरत होता.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सद्दाम हॉटेलच्या जिन्यावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी सुमारे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने सद्दाम जिन्यावरून पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com