लांजा येथील बुद्धिबळ स्पर्धेत उमेश कुलकर्णी विजेते
बुद्धिबळ स्पर्धेत उमेश कुलकर्णी अव्वल
लांज्यात आयोजन ; जिल्ह्यातील १४८ खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ५ : येथील गणपती चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘खुल्या जलद बुद्धिबळ’ स्पर्धेत सातारा येथील उमेष कुलकर्णी यांनी ७.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेला कोकणासह मुंबई, सातारा आणि कोल्हापूरमधील १४८ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेचे उद्घाटन लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली सुनील कुरूप यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर स्कॉर्पिओ सोलरचे संस्थापक रोहित सुर्वे, स्पर्धा संचालिका प्राची सुर्वे, सुचिता सुधीर सुर्वे, अनघा किशोर मयेकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर स्वामी, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास देसाई, मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे, जिल्हा संघटनेचे सहसचिव चैतन्य भिडे, कोषाध्यक्ष मंगेश मोडक आणि ज्येष्ठ खेळाडू चारुदत्त उपाध्ये उपस्थित होते.
या स्पर्धेत तब्बल ३० फिडे (FIDE) मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच शार्दूल तापसे (सातारा) यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. त्यांना अपर्णा शिंदे, चैतन्य भिडे, प्राची सुर्वे, मोहसीन सय्यद आणि कीर्ती मोडक यांनी सहकार्य केले. मनोज रेडीज यांनी सूत्रसंचालन केले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
-----
चौकट
स्पर्धेतील विजेते
स्पर्धेचा निकाल (गटवार): खुला गट : उमेष कुलकर्णी (सातारा), मयुरेश देसाई, साहस नारकर, यश गोगटे, मानस सिधये, सदानंद चौथे, अक्षय खेर, प्रवीण सावर्डेकर, सोहम रूमडे, साहिल बाधणे. महिला गट : तनिष्का अडेलकर, रचना मुणणकर. ज्येष्ठ खेळाडू : संजय कामतेकर, सुनील शिंदे. ३६ ते ५५ वयोगट : विवेक जोशी, मिलिंद नरवणकर, जितेंद्र पटेल. १६ ते ३५ वयोगट : सार्थक साबळे, सचिन कदम, कौस्तुभ हर्डीकर. १५ वर्षांखालील : यश काटकर, यश पवार, नंदन दामले. १२ वर्षांखालील : विहंग सावंत, विराज बनसोड, देवव्रत धूपकर. ९ वर्षांखालील : अन्वय साबळे, तन्मय केसरकर, दीपांशू दळवी. स्थानिक (लांजा) गट : चारुदत्त उपाध्ये, तनिष किनरे, शान बिरवाडकर. विशेष पारितोषिक : वरद चव्हाण (सर्वात लहान खेळाडू).

