नृत्यनाटिकेतून उलगडला कल्पना चावला यांचा जीवनप्रवास
- rat५p३.jpg-
P२६O२८७६८
चिपळूण ः पेढे येथील आर.सी. काळे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनी नृत्यनाटिका सादर करताना विद्यार्थी.
---
कल्पना चावलांना नृत्यनाटिकेतून सलाम
चिपळूणमध्ये कार्यक्रम ; काळे विद्यालयात विज्ञान दिन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : तालुक्यातील पेढे-परशुराम येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने अंतराळवीर कल्पना चावला यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांनी नृत्यनाटिकेतून अभिनव पद्धतीने सादर केला, जो कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला.
विद्यालयातील रामकृष्ण स्मृती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक विशाखा माळी होत्या. व्यासपीठावर प्राध्यापिका सिद्धी राजेशिर्के, माध्यमिक समन्वयक नितीन रेपाळ, शिक्षक प्रतिनिधी सुधीर सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान साहित्याची आकर्षक मांडणी केली होती. तसेच कल्पना चावला यांच्या जीवनावरील नृत्यनाटिकेतून त्यांचा अंतराळ प्रवासाचा संघर्षमय प्रवास उलगडून दाखवण्यात आला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक संदेश पवार, स्वरा तांबीटकर, निकिता साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी सिद्धी राजेशिर्के यांनी विज्ञानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, ‘विज्ञानाचा आणि मानवी जीवनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक घटनेमागे विज्ञान कारणीभूत असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौकस नजरेने निरीक्षण करून स्वतःचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे.’ ज्योती शिरसाट यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानले.
------
विविध स्पर्धांचा निकाल
विज्ञान दिनानिमित्त विज्ञान मंडळाच्या वतीने प्रश्नमंजूषा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः * विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा : ५ वी गुरुकुल ः वैष्णवी गडदे, समृद्धी जोशी, शौर्य पडवेकर. ६ वी गुरुकुल ः श्रीवल्लभ थत्ते, नंदन शितप, समृद्ध भूपेंद्र पवार. ८ वी गुरुकुल ः गार्गी पवार, श्रीकृष्ण महाडिक, श्रेयश खरात. वक्तृत्व स्पर्धा ः आर्या अतुल जोशी, आदित्य आनंद खांडेकर, कृत्तिका विजय घोरपडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

