रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले प्रथम
28730
रेकॉर्ड डान्स स्पर्धेत
नंदिनी बिले प्रथम
तुळसकर द्वितीय, बोडके तृतीय
कणकवली, ता.५ : कलमठ बाजारपेठ (ता.कणकवली) येथील शिवतेजा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले हिने प्रथम क्रमांक मिळवला. गुरुनाथ तुळसकर याने द्वितीय तर वैष्णवी बोडके हिने तृतीय क्रमांक मिळवला. पूर्वा मेस्त्री, गंश परब यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
रेकॉर्ड स्पर्धेत १७ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण शशिकांत कांबळी, आर्या पोयेकर यांनी केले. स्पर्धा पार पाडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते आले. तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर, उपाध्यक्षा अनिता साळगावकर, प्रसाद कांबळी, शशिकांत कांबळी, आर्या पोयेकर, दिनेश पाटील, अमित कांबळी, संदीप कांबळी, तुषार हजारे, सुयोग कांबळी, परेश कांबळी, स्वरुप कोरगावकर, निश्चिय हुन्नरे यांच्यासह मंडळाचे सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

