खो-खो स्पर्धेत सातारा, पुणे आणि सांगलीचे वर्चस्व

खो-खो स्पर्धेत सातारा, पुणे आणि सांगलीचे वर्चस्व

Published on

डेरवण गेम्समध्ये ‘खो-खो’चा थरार
सातारा, पुणे अन् सांगलीचे वर्चस्व; राज्यातील ७२ संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींनी घेतला आनंद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलावर पार पडलेल्या १२व्या ‘डेरवण यूथ गेम्स’मध्ये खो-खो स्पर्धेत सातारा, पुणे आणि सांगलीच्या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावत वर्चस्व गाजवले. यंदाच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून ७२ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.
डेरवण येथे रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये अंतिम सामन्यात शिव प्रतिष्ठान (खंडाळा, सातारा) संघाने पुण्याच्या रमणबाग मित्र मंडळावर एक डाव आणि तीन गुणांनी विजय मिळवला. विजेत्या संघाकडून वरद पोळ, आयुष यादव आणि स्वराज गाढवे यांनी चमकदार कामगिरी केली. मुलींमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाने सांगलीच्या राजमाता अहिल्यादेवी संघावर अवघ्या एका मिनिट राखून थरारक विजय मिळवला. पुण्याच्या अपर्णा वरदे व सई घरत यांचा खेळ उत्कृष्ट ठरला. १८ वर्षांखालील गटात मुलांमध्ये खंडाळा येथील (सातारा) राजेंद्र विद्यालय संघाने मुंबई उपनगरच्या शिरसेकर गांधी संघाचा पाच गुणांनी पराभव करत जेतेपद राखले. सातारा संघाच्या प्रेम लोखंडे, आयुष पवार आणि मयूर जाधव यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलींमध्ये सांगली भिलवडीच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ संघाने ठाणेच्या ज्ञानविकास संघावर एक डाव व एक गुण राखून दिमाखदार विजय मिळवला. सांगलीच्या धनश्री, श्रावणी आणि विद्या तामखडे या भगिनींनी अष्टपैलू खेळ केला.
------
चौकट
वैयक्तिक पारितोषिके
१४ वर्षांखालील मुले
उत्कृष्ट संरक्षक : आयुष यादव (शिव प्रतिष्ठान, खंडाळा), उत्कृष्ट आक्रमक : वेदांत गायकवाड (रमणबाग, पुणे), सर्वोत्कृष्ट खेळाडू : वरद पोळ (शिव प्रतिष्ठान, खंडाळा)
----
१४ वर्षांखालील मुली :
उत्कृष्ट संरक्षक : वेदिका तामखडे (सांगली), उत्कृष्ट आक्रमक : श्रेया जाधव (राजमाता जिजाऊ, पुणे), अष्टपैलू खेळाडू : सई गराडे (राजमाता जिजाऊ, पुणे).
१८ वर्षांखालील मुले : उत्कृष्ट संरक्षक : अमय मूर्चावडे (मुंबई उपनगर), उत्कृष्ट आक्रमक : तरबेज खान (खंडाळा), अष्टपैलू खेळाडू : लोकेश जाधव (खंडाळा)
१८ वर्षांखालील मुली : उत्कृष्ट संरक्षक : धनश्री कंक (ठाणे), उत्कृष्ट आक्रमक : धनश्री तामखडे (सांगली), अष्टपैलू खेळाडू : श्रावणी तामखडे (सांगली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com