भाजप जिल्हा सरचिटणीसपदी सुप्रिया उतेकर
- ratchl५२.jpg
२६O२८७७१
सुप्रिया उतेकर
----
भाजप जिल्हा सरचिटणीसपदी सुप्रिया उतेकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः खेर्डी येथील माजी उपसरपंच सुप्रिया उतेकर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी बुधवारी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये सुप्रिया उतेकर यांना जिल्हा सरचिटणीसपद देण्यात आले आहे.
सुप्रिया उतेकर यांनी याआधी खेर्डी ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून सुप्रिया उतेकर ह्या नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस असणार आहेत. शासनाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासन यांचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवणे, पक्षाकडून येणारे कार्यक्रम राबविणे, पक्ष संघटना मजबूत करणे यासाठी सुप्रिया उतेकर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी दक्षिण जिल्हा पक्षसंघटन अधिक सक्षम प्रभावित करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे व केंद्रस्तरावरून, प्रदेश कार्यालयाकडून येणाऱ्या जबाबदारी यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांना एकत्रित करून काम कराल असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

