

swt59.jpg
O28778
दांडी ः येथे जाळ्यात अडकलेल्या कांडेचोराला जीवदान देण्यात आले.
जाळ्यात अडकलेल्या
‘कांडेचोरा’ला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : शहरातील दांडी श्रीकृष्णवाडी येथे मंगळवारी (ता. ३) सकाळी जाळ्यात अडकलेल्या कांडेचोर प्राण्याला (एशियन पाम सिव्हेट) पारंपरिक मच्छिविक्रेत्या महिला नेहा धुरी यांनी जाळ्यातून सोडविले. हाच कांडेचोर काही वेळाने पुन्हा जाळ्यात अडकल्याचे धुरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पुन्हा त्यास सुखरूप सोडवून जीवदान दिले.
कांडेचोर हा ५३ सेंटीमीटर एवढा लांब असून त्यांचे वजन २ ते ५ किलो दरम्यान असते. त्यांचे खाद्य प्रामुख्याने फळे, साप व उंदीर आहे. या प्राण्याचे शरीर लांब आणि जाड असते. खरखरीत राखाडी केस असतात आणि त्यावर तीन ओळी काळ्या खुणा असतात. डोळ्यांखाली आणि नाकपुडीच्या दोन्ही बाजूला लहान पांढरे ठिपके असतात. ते प्रामुख्याने रात्री सक्रिय असतात आणि विणीचा कालावधी वगळता एकटे राहतात. या वन्यजीवाच्या शिकारीस वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे बंदी आहे, अशी माहिती प्राणीमित्र अक्षय रेवंडकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.