अल्पदरात रुग्णवाहिका सेवेचा ''सामाजिक बांधिलकी''चा संकल्प
swt510.jpg
28759
सावंतवाडीः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अल्पदरात रुग्णवाहिका सेवेचा
‘सामाजिक बांधिलकी’चा संकल्प
२४ तासांची सेवा ः दातृत्वाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून रुग्णांना तत्काळ सेवा दिली जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात २४ तास रुग्णांची दखल घेणाऱ्या या संस्थेने आता स्वतःची रुग्णवाहिका अल्प दरात २४ तास उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी सैनिक पतसंस्था शहर शाखेने १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गंभीर रुग्ण किंवा अपघातग्रस्तांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे घेऊन जाण्यासाठी अनेकदा वेळेवर ‘१०८’ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीने स्वतःची रुग्णवाहिका घेण्याचे ठरवले आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू केली जाईल, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी पुढाकार घेतला. यावेळी चेअरमन बाबुराव कविटकर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाठ, उपकार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडवे आणि संचालक भिवा गावडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी १० हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. शहरातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रवी जाधव, रुपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे. इच्छुक दात्यांनी क्यूआर कोडचा वापर करून आर्थिक मदत करावी व त्याचा स्क्रीनशॉट संबंधित नंबरवर पाठवावा, जेणेकरून संस्थेची रीतसर देणगी पावती दिली जाईल, असे प्रतिष्ठानतर्फे कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

