दुग्ध व्यवसाय विकासाचा राजमार्ग
swt51.jpg
28758
न्हावेली ः येथील प्रशिक्षण शिबिरात पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांचे स्वागत करताना संस्थेचे सदस्य.
दुग्ध व्यवसाय विकासाचा राजमार्ग
शरद धाऊसकर ः न्हावेलीत ‘कृपासिंधू’तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ५ ः दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांनी शासन योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी न्हावेली येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात केले.
न्हावेली येथील कृपासिंधू दुग्ध संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्यावतीने दुग्ध व्यावसायिसांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य धाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आस्वले (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, सावंतवाडी), डॉ. देसाई (तालुका पशुसंवर्धन अधिकारी, सावंतवाडी), ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, स्नेहा पार्सेकर, निकिता परब, अर्जुन मुळीक, दुग्ध सहकाही संस्था मळेवाड, न्हावेली ग्रामसंघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रशिक्षण शिबिरात डॉ. देसाई, डॉ. आस्वले, डॉ. चव्हाण, डॉ. बाळगी यांनी जनावरांचे आहार, आरोग्य, लसीकरण, शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. या शिबिरात न्हावेली, सोनुर्ली, निरवडे येथील शेतकरी व बचतगट महिलांनी प्रशिक्षण घेतले. गोकुळ व कृपासिंधू दुग्ध संस्थेच्या माध्यमातून ५० टक्के किंमतीत गोचीड प्रतिबंधक साबण व जंतांची औषधे वाटप करण्यात आली. सूत्रसंचालन अर्जुन परब, श्री. चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी दुग्ध संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. देसाई यांच्यासह डॉ. आस्वले यांचा धाऊसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

