नेरुर अपघाताला ''बांधकाम'' जबाबदार

नेरुर अपघाताला ''बांधकाम'' जबाबदार

Published on

swt52.jpg
28800
कुडाळ ः पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन देताना रुपेश पावसकर, अर्चना बंगे व ग्रामस्थ.

नेरुर अपघाताला ''बांधकाम'' जबाबदार
रुपेश पावसकर ः दोषींवर कारवाईची पोलिसांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः कुडाळ नाबरवाडी येथील अपघातात नेरुर येथील नीलिमा मेस्त्री यांचा हकनाक बळी गेला. रस्त्यावर आडवे वाढलेले सुरूचे झाड गेले अनेक दिवस लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी तक्रारी करूनही बाजूला केले गेले नाही. त्यामुळे या अपघाताला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असून, याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेरुर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्त्यावर वाढलेली झाडी व रस्त्याची नादुरुस्त साईडपट्टी यामुळे हा अपघात झाला आहे. रस्त्यावर आडवे वाढलेले हे सुरूचे झाड गेले अनेक दिवस लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी तक्रारी करूनही बाजूला केले गेले नाही. याला सर्वस्वी जबाबदार उपअभियंता व शाखा अभियंता आहेत.
कुडाळ शहर ते नेरुरपार पुलापर्यंत आणि जकात नाका ते कवठीपर्यंत जाणार्‍या रस्त्यावरही मोठमोठी झाडे रस्त्यावर वाकलेली असून धोकादायक स्थितीत आहेत. दोन्ही प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम लक्ष देत नसल्याने पावसकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाला धडक दिली. यावेळी कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने पावसकर यांनी कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवले यांना संपर्क साधून जाब विचारला. त्यानंतर इंगवले यांनी ११ मार्चला आपण स्वतः सायंकाळी चार वाजता उपस्थित राहून पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अर्चना बंगे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, प्रवीण नेरुरकर, देविदास नाईक, बाळा पावसकर, शंभुराजे नाईक, गोटू नाईक, अमोल शृंगारे, नारिंग्रेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com