तुळस घाटीतील मोरी धोकादायक
swt54.jpg
28762
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ.
तुळस घाटीतील मोरी धोकादायक
सुजाता पडवळ ः तत्काळ दुरुस्तीबाबत ‘बांधकाम’ला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः वेंगुर्ले ते सावंतवाडी रस्त्यामधील तुळस घाट परिसरात गोवर्धन मंदिर, तुळस घाट शेजारील मोरी गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. हे ठिकाण धोकादायक वळणावर असून त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन या मोरीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तुळस जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी येथील पूजा इंगवले यांच्याकडे केली.
या धोकादायक मोरीबाबत पडवळ यांनी कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. असंख्य वाहनांची ये-जा या मार्गावरून होते. गेल्या दोन वर्षांपासून याच मार्गावरील तुळस घाटीत गोवर्धन मंदिर वळणानजीकच्या मोरीचा भाग जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खचला आहे. तेथील भागाची सतत झीज सुरू असून वळणावरच असलेल्या या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना सतत आपला जीव मुठीत घेऊनच तेथून वाहने हाकावी लागतात. काहीवेळा अपघात होण्याचे प्रसंग या ठिकाणी घडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खचलेल्या भागाला अतिशय कमकुवत असे कुंपण करून धोक्याची सूचना चिन्हांकित केली आहे. सध्या या मार्गाने वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. या धोकादायक परिस्थितीची तत्काळ नोंद घेऊन हा भाग सुरक्षित व वाहतुकीयोग्य बनवावा, अशी मागणी सुजाता पडवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पूजा इंगवले यांना दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

