नांदगाव पावाचीवाडी रस्त्याचे लोकार्पण
swt55.jpg
O28763
नांदगाव ः पावाचीवाडी रस्त्याचे श्रीफळ वाढवून लोकार्पण करताना दिलीप तळेकर व अन्य.
नांदगाव पावाचीवाडी
रस्त्याचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ६ ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नांदगाव पावाचीवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सरपंच रविराज मोरजकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला. यावेळी सरपंच मोरजकर, पंचायत समिती सदस्या वाळके, हनुमंत वाळके, पुनाजी चव्हाण, दीपक चव्हाण, मारुती मोरये, शक्तिकेंद्र प्रमुख संतोष वाळके, बुथ अध्यक्ष कमलेश पाटील व पावाच्यावाडीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.
................
swt56.jpg
28764
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलला संगणक संच प्राप्त झाले.
देवगड हायस्कूलला
पाच संगणक संच
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीमधून येथील शेठ म. ग. हायस्कूलला एकूण पाच संगणक संच आणि एक प्रिंटर प्राप्त झाले. संगणक संच मिळाल्याने शाळेचे कामकाज अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याबद्दल संस्था आणि शाळेच्यावतीने पालकमंत्री राणे यांचे आभार मानण्यात आले.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

