राज्यस्तरीय गायन स्पर्धेत परशुराम शाळा प्रथम
गायन स्पर्धेत परशुराम शाळा प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टच्या बी.एड. महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठी कविता गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एसपीएम परशुराम शाळेने आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मराठी भाषेची तसेच मराठी कवितांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली आली होती. परशुराम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सुलभभारती या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील कवी वसंत बापट यांच्या ‘आभाळाची आम्ही लेकरे’ या कवितेचे प्रभावी सादरीकरण केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये मैत्रेयी तारे, आर्या जठार, कादंबरी सुतार, जैनब परकार, वेदश्री कांबळे, शांतला वरवाटकर, अमृता कणसे आणि निधी पाटील यांचा समावेश होता. या विद्यार्थिनींना शिक्षिका स्वाती आंबेकर, रेणुका रेड्डी आणि वसुंधा शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पटवर्धन तसेच संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

