वेंगुर्ले येथे १५ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ले येथे १५ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
Published on

swt515.jpg
28776
नीलेश राणे

वेंगुर्ले येथे १५ पासून
विविध कार्यक्रमांचे आयोजन
नीलेश राणे वाढदिवस : सलमान अलीचा शो
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ : कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांचा वाढदिवस येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यात १५ ते १७ मार्च या कालावधीत मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी ‘इंडियन आयडल’ विजेता सलमान अली याचा संगीत कार्यक्रम होणार असून, वेंगुर्लेकरांसह संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वरैया फाउंडेशनचे सचिव धनंजय महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला श्री. महाजन यांच्यासह डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, प्रदीप वेंगुर्लेकर, राजू वजराटकर, राकेश सापळे, पंकज शिरसाट, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
यानिमित्त १५ ला सकाळी ७ वाजता कॅम्प येथून ‘सिंधुरन मॅरेथॉन’ सुरू होईल. याचे उद्घाटन ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली धावपटू दुती चंद हिच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते बिंदू दारासिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल. या मॅरेथॉनमध्ये नगरपरिषद वेंगुर्ले, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, जिल्हा शिवसेना व इतर सामाजिक संस्थांचा सहभाग असून ‘वेंगा बॉईज’ नियोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. स्वरैया फाउंडेशन, नीलेश राणे प्रेमी व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी रात्री ८ वाजता वेंगुर्ले कॅम्प मैदानावर सलमान अली यांचा संगीत सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह उपस्थित राहणार असून, सोनाली राऊत आणि इशा शाह यांच्या नृत्याविष्काराची मेजवानी रसिकांना मिळेल.
येथील कांदळवन परिसरात १६ ला सकाळी ७ वाजल्यापासून वेंगुर्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यात नगरपरिषद, रोटरी, लायन्स क्लब आणि स्थानिक संस्थांचा सहभाग असेल. तसेच १७ ला सकाळी १० ते २ या वेळेत वेंगुर्ले गाडीअड्डा येथील डॉ. उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर होईल. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजू वजराटकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com