दारिस्ते गडनदी झाली ''गाळमुक्त''
दारिस्ते गडनदी
झाली ‘गाळमुक्त’
कणकवलीः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून दारिस्ते गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा प्रारंभ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. गुरववाडी, सुतारवाडी, पटेलवाडी या तीन वाडीतील लोकांना या गाळ उपसाचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नीतेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे आभार मानले. यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गावकर, उपसरपंच संजय सावंत, सुरेश गावकर, गोपी सुतार, पोलिसपाटील हेमंत सावंत, संजय गावकर, तात्या गुरव, ग्रामपंचायत सदस्य भाई सावंत, वैष्णवी सुतार, वृषाली कदम, नेहा सावंत, दाजी शेलार, भाऊ सावंत, विनायक गुरव, बाबी साळसकर, जीतू सावंत, केशव सुतार, गणेश गुरव, मदन गुरव, सुरेश गुरव, चेतन गुरव, भरत गुरव, भरत दारिस्तेकर, वासुदेव कदम, महेश सुतार, दशरथ लाड, बळीराम गुरव आदी उपस्थित होते.
.....................
भावई तलाव कामाचे
परुळे येथे भूमिपूजन
म्हापण ः परुळे कोचरे येथील श्री भावई तलाव परिसर सुशोभीकरण करणे या राज्याच्या पर्यटन विभागाच्या २०२४-२५ प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन रविवारी (ता. १) शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे सुमारे ४० लाख किंमतीचे श्री भावई तलाव परिसर सुशोभीकरण करणे हे विकासकाम मंजूर झाले होते. याप्रसंगी शिवसेनेचे सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, विष्णू फणसेकर, शिवसेनेचे अजित राऊळ, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, सदस्य संजय गोसावी, विशाल वेंगुर्लेकर, अनिल सुतार, प्रगती राऊळ, स्वरा हळदणकर, दत्ता साळगावकर, बाळू राणे, उपेंद्र रावले, निवृत्त पोलिस अधिकारी कोचरेकर, आबा कोचरेकर, भाई खवणेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
.......................
वेंगुर्लेत २१ एप्रिलला
कृषी प्रदर्शन, मेळावा
वेंगुर्ले ः येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे २१ ते ३० एप्रिल दरम्यान कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनानुसार भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या शेतकरी मेळाव्यात कोकणातील व कोकण सभोवतालच्या शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू व इतर दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या फळपिकांचे उत्पादन तंत्रज्ञान व संरक्षण याबाबत माहिती देण्यात येईल. हा मेळावा एकूण तीन दिवस कालावधीसाठी असणार आहे. पहिला दिवस फळप्रदर्शन उद्घाटन आणि पाहणी, दुसराच दिवस चर्चासत्र व तिसरा दिवस बक्षीस वितरण व समारोप असा राहणार आहे. कृषी प्रदर्शन तीनही दिवस उपलब्ध असणार आहे. यामध्ये शेतीसंदर्भात नामांकित कंपन्यांचे विविध कृषी तसेच खाद्य स्टॉल असणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेतर्फे केले आहे.
........................
कसाल येथे उद्या
जागतिक महिला दिन
कुडाळ ः कसाल ग्रामपंचायतीतर्फे शनिवारी (ता. ७) जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर व अध्यक्षस्थानी कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य संतोष कांदळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अवधूत मालणकर, मुख्याध्यापक उत्तम मळगावकर, केंद्रप्रमुख उत्तम हरमळकर आदी उपस्थित राहणार आहेत. महिलांसाठी सकाळी रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, फनिगेम्स, दुपारी स्नेहभोजन, खेळ पैठणीचा, हळदीकुंकू, बक्षीस समारंभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

