''आरती प्रभू पुरस्कार'' प्रा. दवणे यांना जाहीर

''आरती प्रभू पुरस्कार'' प्रा. दवणे यांना जाहीर

Published on

swt516.jpg
28786
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना केदार सामंत. बाजूला आनंद वैद्य, विवेक देसाई व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
swt517.jpg
28787
प्रवीण दवणे
swt518.jpg

प्रसाद पंडित

आरती प्रभू पुरस्कार प्रा. दवणे यांना जाहीर
रविवारी सोहळा ः मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्यावतीने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार’ सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या जन्मदिनी रविवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात केले जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी अनंत वैद्य आणि विवेक देसाई उपस्थित होते. चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचे साहित्यातील योगदान व त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात, याकरिता हा पुरस्कार कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी दिला जातो. रोख २१ हजार, स्मृतीचिन्ह, मानपत्र व शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षीचा पुरस्कार ठाणे येथील सुप्रसिध्द कवी प्रा. प्रवीण दवणे यांना बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला अमेरिका स्थित सुप्रसिध्द स्त्रीरोगत्ज्ञ डॉ. अनिल नेरुरकर, बाबा वर्दम थिएटर्सचे संस्थापक चंदू शिरसाट व क.म.शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केदार सामंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com