जागतिक श्रवण दिन शुक्रवारी
श्रवण दिनाचा
शुक्रवारी कार्यक्रम
रत्नागिरी ः जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्ष, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन ६ मार्चला सकाळी १० वाजता स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कर्णबधीर दिव्यांग मुले व व्यक्तींसाठी सरकारी धोरणे, योजना याबाबत मार्गदर्शन तसेच यशोगाथा सादर करण्यात येणार आहे. संबंधितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे.
-----
श्रीमान कथासंग्रहाला
साहित्यरत्न पुरस्कार
रत्नागिरी ः माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या ''श्रीमान'' कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कंळबटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसूरकर, माहेर संस्थेच्या विश्वस्त शर्लिन दिदी, निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश नाईक, महेंद्र मांडवकर, हर्षदा गावडे, विद्या बोंबले, सरपंच तन्वी कोकजे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, सुनील कांबळे, भिकाजी गावडे उपस्थित होते.
----
माने अभियांत्रिकीत
फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट
रत्नागिरी ः राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ही ७ मार्चला संगमेश्वरमध्ये होणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे. आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करू नये. तसेच २०० ते ३०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बूथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपक आदी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई केली आहे, आदेशात नमूद केले आहे. ही परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ९ ते दुपारी १२ वेळेत होणार आहे.
----
गुहागर तहसीलला
आयुक्तांची भेट
गुहागर ः कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच गुहागर तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'' अभियान टप्पा-१ च्या पूर्वतयारीसह तहसील कार्यालयातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी या भेटीदरम्यान विविध सूचना केल्या. अभियानाच्या पहिल्या टप्प्याची पूर्वतयारी कशी सुरू आहे, याची माहिती त्यांनी घेतली. नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

