''टेक्सलन्स'' स्पर्धेला सावंतवाडीत प्रतिसाद

''टेक्सलन्स'' स्पर्धेला सावंतवाडीत प्रतिसाद

Published on

swt522.jpg
28819
सावंतवाडी ः ‘टेक्सलन्स २०२६’ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘टेक्सलन्स’ स्पर्धेला सावंतवाडीत प्रतिसाद
भोसले इन्स्टिट्यूटचा उपक्रम; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातर्फे आणि आयएसटीई पुरस्कृत ‘टेक्सलन्स २०२६’ ही राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा भोसले नॉलेज सिटी येथे उत्साहात झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी उपप्राचार्य गजानन भोसले तसेच परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, कराडचे योगेश महाडिक, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. एस. के. कुलकर्णी, एमआयटीएम कॉलेजच्या उपप्राचार्या पूनम कदम आणि शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे सचिन जोशी उपस्थित होते. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर या विभागांतील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना समारोपप्रसंगी रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मेकॅनिकल विभागाच्या पेपर प्रेझेंटेशनमध्ये रमेश लठ्ठे व संस्कार अणावकर प्रथम, तर साहिल जाधव व सोनू हरमलकर द्वितीय आले. फोटोग्राफी स्पर्धेत संस्कार अणावकर प्रथम तर लोकेश भोगण द्वितीय ठरला. कॉम्प्युटर विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत पारस गावडे, करण गवस, सुजल घागरे, निशांत जाधव व मंथन कर्पे यांच्या ‘अनमॅन्ड डिफेन्स व्हेईकल’ प्रोजेक्टला प्रथम तर मिताली चव्हाण, तन्वी मेस्त्री, भूमिका सातार्डेकर, मालिनी वारंग व गौरी राऊळ यांच्या ‘स्मार्ट ग्रास कटिंग रोबोट’ प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. ‘माईंड मॅट्रिक्स-द पझल अरेना’ या स्पर्धेत लक्ष्मीप्रसाद कानडे व ‘बग बस्टर्स’ ग्रुप प्रथम, तर दीक्षा गवस व ‘लॉजिक लिजंड्स’ ग्रुप द्वितीय आले.
इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत रितेश गवस व ग्रुपच्या ‘ॲडव्हान्स सोलर पॉवर स्प्रेयर’ प्रोजेक्टला प्रथम, तर तेजस गावडे व ग्रुपच्या ‘आयओटी बेस्ड सोलर ग्रास कटर’ प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. पोस्टर स्पर्धेत ''सेव्ह एन्व्हायरर्मेंट -सेव्ह फ्युचर'' या विषयासाठी चैतन्य भगत व समरेश नाईक प्रथम, तर ''इंडस्ट्री फाईव्ह'' या विषयासाठी कुणाल धुरी व ऋषिकेश राऊळ द्वितीय ठरले. सिव्हिल विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत दत्तराज कोदे, हरिश्चंद्र धुरी, मानसी खवणेकर, अथर्व धुरी व रविराज सावंत यांच्या ''पिझो-इलेक्ट्रिक फूट स्टेप पॉवर जनरेशन'' प्रोजेक्टला प्रथम तर रुद्रेश पडते, तनिषा गवस, आर्यन आसोलकर, गुंजन धुरी व तनिषा बंगे यांच्या ''फिलर स्लॅब'' प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. रील मेकिंग स्पर्धेत अॅंजेलिना डिसोझा व टीम प्रथम तर आर्यन पास्ते व टीम द्वितीय ठरली. कार्यक्रमाचे निवेदन हवाबी शेख तर सूत्रसंचालन संचिता कोलापते यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com