कणकवलीत मंगळवारी
शस्त्रक्रियापूर्व तपासणी

कणकवलीत मंगळवारी शस्त्रक्रियापूर्व तपासणी

Published on

कणकवलीत मंगळवारी
शस्त्रक्रियापूर्व तपासणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जन्मतः कापलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढे मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी भोजन, वास्तव्य आणि प्रवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. हे तपासणी शिबिर १० मार्चला सकाळी १० वाजता कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सहा महिन्यांवरील वयोगटातील रुग्ण पात्र असून, पूर्वी शस्त्रक्रिया झालेली असली तरी असे रुग्णही तपासणीसाठी उपस्थित राहू शकतात, अशी माहिती आयोजकांनी दिली. जन्मतः ओठ किंवा टाळू कापलेले असल्यामुळे अनेक मुलांना बोलण्यात, खाण्यात तसेच सामाजिक आयुष्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवजीवन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या शिबिराबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com