दर्जेदार उत्पादनांसह ब्रँडींग आवश्यक!
28853
दर्जेदार उत्पादनांसह ब्रँडींग आवश्यक!
कणकवली कॉलेजमध्ये ‘उद्योजक आपल्या भेटीला’
कणकवली, ता. ५ : कणकवली कॉलेज येथे आज अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फळ प्रक्रिया उद्योगातील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विशेष चर्चासत्र झाले.
या कार्यक्रमात विचारमंचावर प्राचार्य युवराज महालिंगे, चंद्रराज उद्योग समूहाचे मालक दिनेश नारकर, हर्ष उद्योग समूहाचे हर्षल हिंदळेकर (फळप्रक्रिया उद्योजक), डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. शामराव डिसले आणि विभाग प्रमुख प्रा. मंदार पडेलकर उपस्थित होते.
‘उद्योजक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात दिनेश नारकर यांनी स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादने तयार करायला हवीत. या उत्पादनांचे ब्रॅडिंगही तितकेच महत्वाचे असल्याचे मार्गदर्शन केले. तसेच तरुणांनी वेळेचा सदुपयोग करून छोटा-मोठा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन केले. हर्षल हिंदळेकर यांनी कोकण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या फळांवर योग्य प्रक्रिया करून विविध पदार्थ कसे तयार करता येतील, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन कल्पना, जिद्द आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तरच व्यवसायात मोठे यश मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले. स्नेहा असगेकर यांनी सूत्रसंचालन केले. रिंकी दळवी हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

