रत्नागिरी - अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी - अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

Published on

ट्रक चालकाविरुद्ध
अपघात प्रकरणी गुन्हा
संगमेश्वर,ता.५ ः मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथील हॉटेलसमोर ट्रक आणि मोटारसायकलमध्ये अपघात होऊन भाऊ–बहीण जखमी झाले.
याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक निशिकांत भोंडवलकर (वय २५, रा. शिवडी, मुंबई) हे मोटारसायकलने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची बहीण मिताली विनायक सांगळे (रा. बीडीडी चाळ, शिवडी, मुंबई) बसलेली होती. दरम्यान, समोरून गोवा बाजूकडून येणारा टाटा मालट्रक चालक हरिभाऊ रघूनाथ गलगट्टे (वय ५२, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड) याने रस्त्याची परिस्थिती न पाहता भरधाव वेगाने आणि मध्यभागातून वाहन चालवत मोटार सायकलच्या उजव्या बाजूस धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या अपघातात हार्दिक भोंडवलकर व मिताली सांगळे यांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. याबाबत तपास पोलीस हवालदार एस. एस. जाधव करीत आहेत. या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com