क्राँकिटीकरण
‘तीनबत्ती’तील महामार्ग काँक्रीटीकरणास गती
ठेकेधारकांकडून खबरदारी ; पादचाऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : भरणे येथून दापोलीपर्यंत राज्य महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. ठेकेधारक कंपनीकडून सद्यःस्थितीत तीनबत्तीनाका येथील राज्य महामार्ग कामातील काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी बाजारपेठेत चारही दिशेने जाणारे मार्ग अडवण्यात आहेत. ठेकेधारक कंपनीकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
भरणे येऊन राज्य महामार्गाच्या कामास सुरुवात करत अण्णाच्या पऱ्यांनजीक एका मार्गिकेचे कॉक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याठिकाणी महावितरणच्या विद्युत खांबांचा अडथळा निर्माण झाल्याने काही ठिकाणाचे कॉक्रिटीकरण रखडले होते. मात्र रस्त्यालगतचे विद्युत खांब हटवण्याचे काम तातडीने हाती घेत हा अडसरही दूर झाल्याने कामाला गती मिळाली आहे.
या पाठोपाठच तीनबत्तीनाक्यातील राज्य महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.२० दिवसापूर्वी हाती घेण्यात आलेल्या कामासाठी बाजारपेठेत चार दिशेने जाणारे मार्ग अडवण्यात आले. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करताना नगरपरिषदेच्या पाठीमागील मैदानातून वाहने मार्गस्थ होत आहेत. तीनबत्तीनाका येथील गुंतागुंतीचे काँक्रिटीकरणाचे काम ठेकेधारक कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामादरम्यान पादचाऱ्यांसह वाहनचालकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. तीनबत्तीनाका नगरपरिषदेचे कार्यालय देखील आहे. यामुळे नगरपरिषदेत येथे दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यादृष्टीनेही ठेकेधारक कंपनीकडून आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

