

swt530.jpg
28877
दाणोली : पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त साटम महाराज यांची सजविण्यात आलेली उत्सवमूर्ती.
swt531.jpg
28878
दाणोली : दर्शनासाठी भाविकांनी लावलेली रांग.
दाणोलीत साटम महाराज यांचा जयघोष
पुण्यतिथी सोहळा उत्साहात ः दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला. या निमित्ताने दाणोलीनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
आंबोली - बेळगाव मार्गालगत असलेल्या साटम महाराजांच्या समाधी स्थळी आणि त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावर्षीही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भक्तांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने योग्य नियोजन केले होते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या उत्सवानिमित्त दिवसभर मंदिरात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसादाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती; मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री पालखी प्रदक्षिणा आणि इतर कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.