जामसंडेत कीर्तनमालेतून विविध विषयांवर प्रबोधन
swt533.jpg
28892
जामसंडे ः येथे संदीप मांडके यांचे कीर्तन झाले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
जामसंडेत कीर्तनमालेतून
विविध विषयांवर प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिर न्यासाच्या वतीने तीन दिवस विविध विषयांवर जामसंडे येथे कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरात हे कीर्तन झाले. राष्ट्रीय कीर्तनकार बुवा संदीप मांडके (पुणे) यांनी कीर्तन केले. त्यांना ऑर्गन साथ प्रसाद शेवडे यांनी, तबला साथ अभिनव जोशी यांनी तर पखवाज साथ गौरव पाटणकर यांनी केली. ''वीर चाफेकर बंधू, वीर येसाजी कंक, स्वातंत्र्यवीर सावरकर'' असे कीर्तनाचे तीन विषय होते. रोज एका विषयावर कीर्तन सादर करण्यात आले. त्याला श्रोत्यांकडून प्रतिसाद लाभला.
........................
swt534.jpg
28893
आडाळी ः शाळा क्र. १ चे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसोबत मुख्याध्यापक सायली देसाई, सरपंच पराग गावकर व मान्यवर.
‘सुंदर शाळा’ अभियानात
आडाळी क्र. १ द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ६ : आडाळी जिल्हा परिषद शाळा क्र. १ ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३ अभियानात दोडामार्ग तालुक्यात दुसरा नंबर पटकवला. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षी शाळेत तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला. मुख्याध्यापिका सायली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक रामदास पावरा, दर्शना केसरकर यांनी सरपंच पराग गांवकर यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व सरपंच गावकर यांनी स्वखर्चाने आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले. शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी लोकसहभागातून एक लाखांहून अधिक निधी उभा केला. माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष अमोल परब यांच्या नेतृत्वाखाली रंगकामासाठी नव्वद हजार एवढ्या निधीचे संकलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

