महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा देवरुखमध्ये सन्मान

महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा देवरुखमध्ये सन्मान

Published on

- rat६p१.jpg-
२६O२८९२७
देवरुख ः लाईनमन दिनानिमित्त तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना महावितरणचे अधिकारी.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः लाईनमन दिनानिमित्त सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन महावितरण उपविभागीय कार्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले. तसेच महावितरणचा लोगो असलेल्या टोप्या सर्व कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या.
देवरुख येथे झालेल्या या कार्यक्रमाला तांत्रिक कर्मचारी मुख्य तंत्रज्ञ सुरेश बावधने, प्रधान तंत्रज्ञ सुभाष यादव, नंदादीप दोरखडे, वरिष्ठ तंत्रज्ञ महेश जोशी व स्मिता शिंदे यांना प्रमुख उपस्थित केले. यावेळी सहाय्यक अभियंता रवींद्र खोत यांनी प्रास्ताविकात कंपनीतील तांत्रिक कामगाराबद्दल माहिती देतानाच महावितरण कंपनीची प्रगती जलद गतीने होण्यास सर्व तांत्रिक कर्मचारी खूप महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. सिनिअर ऑपरेटर महेंद्र शिवलकर यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सेवा, सुरक्षितता आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करून सर्वांनी विद्युत वाहिनीवर सुरक्षित काम करा, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com