लोकमान्य टिळकांवरील संगीत नाट्यमय कार्यक्रम दिमाखात

लोकमान्य टिळकांवरील संगीत नाट्यमय कार्यक्रम दिमाखात

Published on

rat६p२.jpg-
26O28928
रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित लोकमान्य टिळकांवरील संगीत नाट्यमय कार्यक्रम सादर करताना खल्वायनचे कलाकार.
---
लोकमान्यांच्या कार्याचा सुरेल आविष्कार
खल्वायन संस्थेचे सादरीकरण ; संगीत नाट्यमय कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य टिळक : सहस्त्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम जयेश मंगल पार्क येथे रंगला. या कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण खल्वायन संस्थेने केले. सुरेल नाट्यपदे, दमदार अभिनय, देखणे नेपथ्य, प्रभावी प्रकाशयोजना आणि प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत यांच्या संगमातून सादर झालेला हा दीर्घांक उपस्थित रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.
सुमारे साडेचारशे रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात सादर झाला. नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दीर्घांकाचे लेखन व दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी व संगीत दिग्दर्शन राम तांबे यांचे होते. या नाट्यमय दीर्घांकात निवेदक विनायक (राजू) जोशी, आप्पाजी– मनोहर जोशी, बाप्पाजी– चिन्मय दामले, गायक चैतन्य गोडबोले, गायिका मधुरा सोमण, ग्रामस्थ- श्रीनिवास जोशी, निनाद तेंडुलकर, श्रीरंग तेंडुलकर, अथर्व सुपल आणि लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत प्रदीप तेंडुलकर यांनी प्रभावी भूमिका साकारली. या दीर्घांकासाठी ऑर्गनसाथ पार्थ परांजपे, तबलासाथ देवाशिष बापट आणि पखवाज साथ संकेत पाडळकर यांनी केली. गायनसाथ राम तांबे, प्रसन्ना प्रभुतेंडोलकर व श्रेया भावे यांनी केली.
प्रकाशयोजना मंगेश लाकडे, पार्श्वसंगीत राधा दाते तर रंगभूषा रामदास मोरे यांनी केली. विषयाला साजेसे देखणे नेपथ्य मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे, सुधाकर घाणेकर आणि अमित धांगडे यांनी उभे केले. रंगमंच व्यवस्था प्रज्ञा जोशी, अर्पिता बापट, शमिका जोशी व कौस्तुभ जोशी यांनी सांभाळली. वेशभूषा श्रीनिवास जोशी यांनी पार पाडली. खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर आणि खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com