ल. ग. पटवर्धनचे यश
rat६p३.jpg-
२६O२८९२९
रत्नागिरी : जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात यश मिळवणारे ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी.
कब-बुलबुल मेळाव्यात
ल. ग. पटवर्धनचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : भारत स्काऊट आणि गाईड आयोजित चिपळूण येथे झालेल्या जिल्हास्तरीय ‘कब-बुलबुल’ मेळाव्यात कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरने चमकदार कामगिरी केली.
शाळेतील इयत्ता चौथीतील सहा कब विराज सावंत, भाविक चव्हाण, श्रीराज पवार, वेद नेवरेकर, देवांश गराटे, स्मित आंबेकर आणि ६ बुलबुल ओवी आंबेकर, गार्गी आखाडे, मीरा झगडे, उर्वी कळंबटे, क्रितिका हरचकर, सावी भोसले तसेच हणमंत ऐवळे, नेहा राजेशिर्के व गायत्री औघडे हे मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेने पहिल्यांदाच या जिल्हास्तरीय मेळाव्यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांमध्ये मुलांनी (कब) शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा, हस्तकौशल्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ३ चषक व मुलींनी (बुलबुल) शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये दोन चषक पटकावले. सहभागाचा एक चषक असे एकूण सहा चषक मिळवून पहिल्याच वर्षी कौतुकास्पद कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि र. ए. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य मनोज पाटणकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

