चिपळूण आगारातर्फे १५ पर्यंत एसटीच्या जादा फेऱ्या

चिपळूण आगारातर्फे १५ पर्यंत एसटीच्या जादा फेऱ्या

Published on

चिपळूण आगारातर्फे जादा बस फेऱ्या
शिमगोत्सवासाठी नियोजन; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः कोकणातली शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने मुंबई-पुण्याहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने चिपळूण आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष नियोजन केले आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही जादा वाहतूक सेवा १५ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान तब्बल २७४ जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली.
होळी, पालखी सोहळा आणि ग्रामदेवतांच्या जत्रांचे आकर्षण प्रत्येक कोकणवासियाला असते. कामानिमित्त शहरात असणारे भाविक मोठ्या संख्येने गावच्या दिशेने रवाना झाले आहेत. प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन चिपळूण आगाराने परतीच्या प्रवासासाठीही आगाऊ नियोजन केले आहे. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर सध्या प्रवाशांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
याबाबत श्री. चव्हाण म्हणाले, मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर यांसारख्या प्रमुख मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. शिमगोत्सव काळात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
-----
असे आहे नियोजन
चिपळूणमधून सोडण्यात येणाऱ्या फेऱ्या २६ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीसाठी आहेत. एकूण २७४ जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून सर्वाधिक फेऱ्या मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली आणि भाईंदर या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com