वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून 
ऐच्छिक करावे ः सावंत

वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून ऐच्छिक करावे ः सावंत

Published on

29012
श्रीकांत सावंत

वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून
ऐच्छिक करावे ः सावंत

सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ६ ः वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून ऐच्छिक करावे, अशी मागणी मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबत सावंत यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की गेली अनेक वर्षे शासन तथा विविध लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची भेट घेत तसेच सामाजिक स्तरावरून पाठपुरावा करत विविध मागण्या सातत्याने लावून धरल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे, अशी प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रात एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा व नर्सिंग यांसारखे वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध होणे आवश्यक आहे. कोकणातील विद्यार्थ्यांचा बुद्यांक तसेच कौशल्य हे अव्वल आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षणादरम्यान इंग्रजी भाषेतील न्यूनगंड दूर करण्यासाठी राज्याने हा निर्णय घ्यावा. मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाचा लाभ झाला तर स्थानिक स्तरावरील विविध वैद्यकीय रिक्त पदांचा प्रश्न सुटेल. वैद्यकीय यंत्रणांवरचा ताण नियंत्रणात येत आरोग्य व्यवस्था सुधारेल, असे सावंत यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नीतेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com