पणदूर संविताश्रमामध्ये 
राणे हॉस्पिटलतर्फे मदत

पणदूर संविताश्रमामध्ये राणे हॉस्पिटलतर्फे मदत

Published on

29005

पणदूर संविताश्रमामध्ये
राणे हॉस्पिटलतर्फे मदत

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः होळी सणाचे औचित्य साधून राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर आणि ए. टी. राणे यांच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रमाला मदत करण्यात आली. वयोवृद्धांना मदत करणे म्हणजे खरा सण साजरा करण्यासारखे आहे, असे राणे यांनी याप्रसंगी सांगितले.
राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर आणि ए. टी. राणे यांनी पणदूर येथील संविता आश्रमातील वृद्धाश्रमात होळी सण साजरा केला. ज्येष्ठांशी संवाद साधत मिठाई वाटप करण्यात आले. या आश्रमाला राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्याकडून २५ मेडिकल कॉट तसेच ए. टी. राणे यांनी वैयक्तिक स्वरुपात देणगीचा धनादेश संविता आश्रमचे संदीप परब यांच्याकडे सुपूर्द केला. वृद्धांसोबत होळीचा आनंद वाटून घेण्यात कृतज्ञता वाटली, असे राणे यांनी सांगितले.
...................
29009

राज्य बुद्धिबळ स्पर्धेत
सोहम देशमुखचे यश
सावंतवाडी, ता. ६ : डेरवण येथे आयोजित ‘डेरवण युथ गेम्स २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोहम देशमुख याने उत्कृष्ट कामगिरी करत सहावा क्रमांक पटकावला. सोळा वर्षांखालील वयोगटात झालेल्या या स्पर्धेत एकूण १०६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या खेळवल्या गेल्या. त्यापैकी ५.५ गुण मिळवत सोहमने उल्लेखनीय यश प्राप्त केले. या यशाबद्दल त्याला १००० रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी सोहमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com