पाककला स्पर्धेला कुडाळात प्रतिसाद
swt69.jpg
28969
कुडाळ ः परीक्षक तनिशराणे यांचा सत्कार करताना डॉ. दीपाली काजरेकर, निर्मला पाटील व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
पाककला स्पर्धेला
कुडाळात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्या वतीने मराठा समाज हॉल येथे आयोजित पाककला स्पर्धेमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. ‘पनीर व्हेज डिश’ या विषयावर आधारित विविध नावीन्यपूर्ण व आकर्षक पाककृती स्पर्धकांनी सादर केल्या. स्पर्धेचे परीक्षण तनिश राणे यांनी केले. याच दिवशी दुसऱ्या सत्रात महिलांसाठी विविध फनी गेम्स घेण्यात आले. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत खेळांचा आनंद लुटला.
या सर्व स्पर्धांचा निकाल व पारितोषिक वितरण रविवारी (ता. ८) दुपारी ३ वाजता येथील मराठा समाज हॉल येथे होणार आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर, उपाध्यक्ष स्वाती सावंत, सचिव निर्मला पाटील, प्रज्ञा राणे, निधी दळवी, अनिता राणे, रश्मी नेमळेकर, साक्षी बिर्जे, रेवती राणे, नेहा परब, संगीता नलावडे, अदिती सावंत, प्रणाली चव्हाण, वेदिका सावंत, भक्ती सावंत, सीमा परब उपस्थित होत्या.
उपक्रमासाठी शिल्पा रावले, सुवर्णलता राऊळ, सोनाक्षी शिरसाट, तनवी वाळके, प्रणिता राणे, संगीता बावकर, नंदिनी कुडाळकर, मंगल कोठावळे, श्रुती सावंत, सोनल आंब्रे, सारिका कासदेकर, नीता पाटील, किमया वेंगुर्लेकर यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

