भाजपच्या शिष्टमंडळाकडून
बांद्यात अंगणवाड्यांची पाहणी

भाजपच्या शिष्टमंडळाकडून बांद्यात अंगणवाड्यांची पाहणी

Published on

28990

भाजपच्या शिष्टमंडळाकडून
बांद्यात अंगणवाड्यांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः शहरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाड्यांची पाहणी भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
आळवाडा, पानवळ तसेच देऊळवाडी परिसरातील अंगणवाड्यांना भेट देत परिस्थितीची पाहणी करण्यात आली. श्री. कामत यांनी तत्काळ दखल घेत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी काम सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अंगणवाडी सेविका व पालकांशी संवाद साधत आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. अंगणवाड्यांसाठी स्वखर्चातून आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे एका अंगणवाडीच्या रंगकामाला त्वरित सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर, बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्यासह श्याम मांजरेकर, श्रेया केसकर, देवल येडवे, शैलेश केसरकर, राकेश केसरकर, नीलेश नाटेकर, जय पटेकर, आप्पा धामापूरकर, मनोज कल्याणकर, सुनील धामापूरकर, सिद्धेश महाजन, नीतेश पेडणेकर, उदय येडवे, विनेश गवस, कैलास गवस आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com