फोंडाघाटचा अमित ''स्वस्तिक श्री'' चा मानकरी

फोंडाघाटचा अमित ''स्वस्तिक श्री'' चा मानकरी
Published on

swt611.jpg
28974
कुडाळः ‘स्वस्तिक श्री २०२६’ चा मानकरी ठरलेल्या अमित कदमचा सन्मान करताना धीरज परब. (छायाचित्र ः अजय सावंत)

फोंडाघाटचा अमित ‘स्वस्तिक श्री’ चा मानकरी
कुडाळला आयोजन : ज्ञानेश्वर आळवे ‘स्वस्तिक श्री मेन फिजिक’ गटात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ : फोंडाघाटचा अमित कदम ‘स्वस्तिक श्री २०२६’ चा मानकरी ठरला, तर कुडाळ येथील गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटरचा ज्ञानेश्वर आळवे याने ‘स्वस्तिक श्री मेन फिजिक’ गटात प्रथम क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनशी संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि स्वस्तिक प्रतिष्ठान, कुडाळ आयोजित ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंनी पिळदार शरीरयष्टीचे आणि विविध पोझेसचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. राज्यस्तरीय स्पर्धेला साजेसे असे भव्य आयोजन पाहून जिल्ह्यातील शरीरसौष्ठव क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसाद रेगे, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. नालंदा काजरेकर-परब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, स्वस्तिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज परब, गणेश म्हाडदळकर, अभय शिरसाट, साईराज जाधव उपस्थित होते. परीक्षक रामकृष्ण चितळे, आंतरराष्ट्रीय पंच विजय मोरे, किशोर सोन्सूरकर, सुधीर हळदणकर, सौरभ वारंग, विक्रांत गाड, महेश परब, हेमंत नाईक, कुणाल पांचाळ व अंकित सोन्सूरकर यांनी काम पाहिले.
नगराध्यक्ष बांदेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत तरुणांसाठी हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक मगदूम यांनी ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत आयोजित या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजक धीरज परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
.................
चौकट
स्पर्धेचा गटवार निकाल अनुक्रमे
५५ किलो गट : शुभम हळदिवे, पराग बोंद्रे, प्रथमेश वाघमारे, अंकित जाधव, प्रणव वाळके, अमोल तेली. ६० किलो गट - भूषण गवंडी, चिन्मय मळगावकर, आकाश नाईक, मंजीत मुळीक, प्रथमेश पाटकर. ६५ किलो गट-गणेश सातार्डेकर, गणेश सरवंजे, मेघःश्याम धुरी, बळीराज पाटकर, संदीप सडवेलकर, शेरबहादूर भोगटे. ७० किलो गट - जयप्रकाश नार्वेकर, बंटी सारंग, ज्ञानेश्वर आळवे, मंगेश घोगळे, अदनान करोल, साहिल तोरस्कर. ७० किलोवरील गट-अमित कदम, सौरभ चव्हाण, महादेव पंदारे, हेमंत चव्हाण. मेन फिजिक-ज्ञानेश्वर आळवे, शुभम हळदिवे, हितेंद्र कदम, पराग बोंद्रे, वेदांत केरकर. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन गुंड, प्रथमेश धुरी, जगन्नाथ गावडे, अभिजित गोवेकर, सुशांत परब, भूषण राणे, चेतन राऊळ, यतीन माजगावकर व अमर अणसूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com