जिल्ह्यातील ४२३५ हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील ४२३५ हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट
Published on

-rat६p१३.jpg-
२६O२८९८२
राजापूर ः सौंदळ येथील वासुदेव घाग यांच्या नर्सरीमध्ये रुजवात केलेली बांबूची रोपे.
-----
जिल्ह्यात ‘मनरेगा’तून बांबू लागवडीचा विस्तार
चार हजार २३५ हेक्टरचे उद्दिष्ट; आतापर्यंत ७७.८८ हेक्टरवर लागवड, पावसाळ्यात क्षेत्र वाढणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून गावोगावी बांबू लागवड करीत जिल्ह्याचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. त्याची कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला ५ हेक्टर याप्रमाणे ४ हजार २३५ हेक्टरचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. सुरू असलेल्या उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी बांबू लागवडीला ब्रेक लागणार असला तरी, पावसाळ्यामध्ये त्याला गती मिळून बांबू लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे.
जिल्ह्यामध्ये निश्‍चित करण्यात आलेल्या ४ हजार २३५ हेक्टर उद्दिष्टांपैकी ४८७.९ हेक्टर क्षेत्राच्या लागवडीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ७७.८८ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे. त्यातून तब्बल २२ कोटी ९७ लाख ६५६ रुपयांची उलाढाल झाली आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गेल्या काही वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेतून बांबू लागवडीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आला आहे. त्याची कृषी विभागातर्फे अंमलबजावणी केली जात असून प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच हेक्टर क्षेत्र लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये १२ हेक्टर, दापोलीमध्ये २.९४ हेक्टर, गुहागरमध्ये १.१० हेक्टर, खेडमध्ये ४ हेक्टर, लांज्यामध्ये १ हेक्टर, मंडणगडमध्ये ५४ गुंठे, राजापूरमध्ये ३५.५४ हेक्टर, रत्नागिरी ७.३५ हेक्टर आणि संगमेश्‍वरमध्ये १३.३९ हेक्टर लागवड झाली आहे. कमी श्रमामध्ये जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या या बांबू लागवडीच्या माध्यमातून नागरिकांच्या हाताला काम अन् आर्थिक प्रगती साधली जात असताना पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासही मदत होणार आहे.
----
दृष्टिक्षेपात
तांत्रिक मान्यता दिलेले क्षेत्र ः ४९२.१७ हेक्टर
प्रशासकीय मान्यता दिलेले क्षेत्र ः ४८७.९ हेक्टर
लागवड झालेले क्षेत्र ः ७७.८८ हेक्टर
एकूण खर्च ः २२ कोटी ९७ लाख ६५६ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com