रत्नागिरी-डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ला प्रथम पारितोषिक

रत्नागिरी-डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ला प्रथम पारितोषिक

Published on

Rat6p12.jpg
28981
रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत डोंबिवलीच्या श्रीकला संस्कार न्यासच्या दगडी भिंत या नाटकाने प्रथम पारितोषिक मिळवले. या नाटकातील एक क्षण.
--------

राज्य नाट्य स्पर्धा - लोगो

डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ला प्रथम पारितोषिक
श्रीकला संस्कार न्यासची बाजी ; ‘कर्ण’ द्वितीय तर ‘द हिंद लेडी’ तृतीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उत्साहात झाली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या श्रीकला संस्कार न्यास या संस्थेच्या ‘दगडी भिंत’ या नाटकाला प्रथम क्रमांकासह ६ लाखाचे पारितोषिक पटकावल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आली. स्पर्धेत बारामतीच्या नटराज नाट्य कला मंडळाच्या ‘कर्ण’ या नाटकाला ४ लाख रुपयांचे द्वितीय आणि मुंबईतील नवहिंद बालमित्र मंडळाच्या ‘द हिंद लेडी’ या नाटकाला २ लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा झाली होती. त्यामध्ये राज्यभरातून निवडलेल्या ४५ नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक आनंद बापट (दगडी भिंत) यांना मिळाले असून कल्पिता राणे (कर्ण) यांना द्वितीय, तर शिवानी पेडणेकर (द हिंद लेडी) यांना तृतीय पारितोषिक जाहीर झाले. उर्वरित निकाल अनुक्रमे असा ः नेपथ्य- शुभांक कदम (दगडी भिंत) यांना प्रथम, संजय सुतार (चुटपुट्या) यांना द्वितीय आणि ओंकार चौधरी (मी कुमार) यांना तृतीय पारितोषिक मिळाले. प्रकाश योजना- विनोद रोहडे (दगडी भिंत), चेतन ढवळे (कर्ण), सलील मेश्रे (द हिंद लेडी), रंगभूषा विभाग- उल्लेख खंडारे (दगडी भिंत), डॉ. राजेश खटावकर (वस्तुभूमी), दत्ताजी जाधव (काळोख्या जत्रेत), संगीत दिग्दर्शन- ओंकार जाधव (दगडी भिंत), कुणाल भावसार (कर्ण), अभिजित पटवर्धन (वामन आख्यान).

चौकट
उत्कृष्ट अभिनयासाठी जाहीर झालेली नावे
या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठीही अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. पुरुष कलाकारांमध्ये हर्षवर्धन कारंडे-देशमुख, नितार पाटील, प्रा. दीपक आमोणकर, वैभव रघुनाथ, सुनील गायकवाड, संतोष पाटील, ओम चव्हाण, इरफान मुजावर आणि मनोज डोळसकर यांचा समावेश आहे. महिला कलाकारांमध्ये श्रुती गांगणे, कल्पिता राणे, मितीला इनामदार, रुपाली राजत, शिवानी पेडणेकर, रेश्मा सावंत, प्रियंका जंगम, आमृपाली आवचट-कुलकर्णी, कावेरी भावालकर आणि भावना रेटे यांना गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com